ऍमेझॉनची धमाकेदार ऑफर; नोकरीसोबत मिळतायेत 1 लाख रूपये
ऍमेझॉनच्या या धमाकेदार ऑफर मागे नक्की काय आहे रहस्य?
मुंबई : 'ऍमेझॉन' कंपनी जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाते. दरम्यान कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे प्रत्येक जण ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देत आहे. ऑनलाईन शॉपिंगची वाढती गरज पाहता 'ऍमेझॉन' कंपनीने अनेकांना रोजगाची संधी उपलब्ध करून दिली. आता ऍमेझॉनने नविन वेअरहाऊस कर्मचाऱ्यांना 1 हजार पाउंड म्हणजे जवळपास 1 लाख रूपये जॉयनिंग बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी असं करत आहे कारण कंपनीला शक्य तितक्या लवकर भरतीचे संकट संपवायचे आहे.
वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी यूकेमधील वेअरहाऊसमध्ये पिकर्स आणि पॅकर्सची "तातडीची गरज" असल्याचे सांगत आहे. यूके फर्म सध्या खूप संघर्ष करत आहे. कोरोना महामारी दरम्यान, कर्मचाऱ्यांमुळे त्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या महिन्याच्या अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की जून अखेरपर्यंत तीन महिन्यांत 953,000 जागा रिक्त होत्या.
जुलै महिन्यात पहिल्यांदा ही संख्या एक मिलियनवर गेली होती. यामध्ये ट्रक ड्रायव्हर्स आणि हॉस्पिटेलिटी या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक मागणी आहे. ऍमेझॉनच्या वेबसाईटवर आता जाहिराती देत आहे. 18 सप्टेंबरपूर्वी नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 हजार पाउंड बोनस म्हणून दिला जाणार आहे.
कंपनी कर्मचाऱ्यांना प्रति तास 11.10 पाउंड देणार आहे. एवढंच नाही तर ओव्हरटाईम करणाऱ्यांना 22.20 पाउंड पर्यंत लाभ मिळणार आहे.