नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ट्रम्प आपल्या कुटुंबासोबत ताज महाल पाहाण्यासाठी येणार आहेत. यानिमित्त आग्र्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.  विशेष म्हणजे श्री कृष्णाच्या पवित्र जन्मभूमित ट्रम्प यांचं स्वागत अशा आशयाचे मोठमोठे पोस्टर्स आग्रामध्ये जागोजागी लावण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. ट्रम्प सपत्नी ताजमहालला भेट देणार आहेत त्यामुळे ताजमहालच्या पूर्वेकडच्या गेटवर एटीएसचं कमांडो पथक तैनात करण्यात आंलंय. या पथकामध्ये महिला कमांडोंचाही सहभाग आहे.



बॉलिवूडची भूरळ


ट्रम्प यांना बॉलिवूडची भूरळ पडलीय. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी ट्रम्प यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत ट्रम्प यांचा बाहुबली अवतार पाहायला मिळतोय... हे एक मीम असून, या व्हिडिओ खाली त्यांनी भारतात आपल्या सर्व चांगल्या मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचं लिहिलंय.


भेटीत काय साध्य ?


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीत काय साध्य होणार ? याची उत्सुकता आहे. अमेरिका आणि भारत या दोन बलाढ्य लोकशाही देशांचे प्रमुख एकमेकांना भेटत आहेत. दोन्ही देशांच्या मैत्रीचा नवा अध्याय लिहीला जातोय. ही भेट दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे असं मत आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांनी मांडलंय.