मुंबई : अमेरिकेत एका तरूणाने घोड्यासोबत सेक्स केल्याची विकृत घटना समोर आली आहे. मालकाने पशुवैद्यकांकडून केलेल्या चाचणीत घोड्याचा बलात्कार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणी एका आऱोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता, न्य़ायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील टेक्सास शहरात एका तरूणाने एका घोड्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीय. तब्बल एक दोन नव्हे तर अनेक वेळा त्यांनी अशाप्रकारे घोड्यासोबत सेक्स केला. या प्रकरणात जेव्हा घोड्याच्या मालकाला घोडा जखमी झाल्याची माहीती मिळाली. त्यावेळी मालकाने पशुवैद्यकांकडून घोड्याची तपासणी केली असता, त्याच्यावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली.मात्र या घटनेत घोड्यावर नेमका बलात्कार कोण करतंय हे समोर आले नव्हते.  


बलात्काराच्या या घटनेनंतर एक तरूणावर घोड्या मालकाला संशय आला होता. पण काही महिन्यानंतर, जेव्हा बुगोमा पुन्हा तबेल्यात दिसला, तेव्हा मालकाला संशय आला. त्यामुळे घोड्या मालकाने पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुगोमा निघून गेल्यावर त्यांना घोड्यांचे पाय एकमेकांना बांधलेले दिसले. त्यामुळे मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी जीन मेरी बुगोमा या तरुणाला अटक केली.  


चौकशीत आरोप फेटाळले 


बुगोमा या तरुणाला ताब्यात घेत त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने त्याचे सर्व आरोप फेटाळले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी डीएनए नमुने घेतले. डीएनए चाचणीत जे काही समोर आले ते पाहून पोलीसही हैराण झाले. घोडा आणि बुगोमाचा डीएनए जुळला होता. तीच बाब न्यायालयात ग्राह्य धरण्यात आली. तसेच तरुणाने घोड्यावर केलेला बलात्कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होता. सुनावणीनंतर न्यायाधीशांनी बुगोमाला घोड्यावर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.