मुंबई : आपल्या ग्राहकांसोबत अधिक कनेक्ट राहण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. यातच अॅमेझॉनने ट्विटर एका मुलीला दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे. अॅमेझॉन हेल्पच्या ट्विटर हॅंडलवर एक मुलीने अॅमेझॉनला प्रश्न विचारता अॅमेझॉनकडून रिप्लाय आला की, आम्ही तुमची काय मदत करु शकतो. यावर त्या मुलीने सिनेमातील गाणे लिहिले. तर त्यावर अॅमेझॉनने मजेशीर उत्तर दिले. दोघांमधील हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर युजर्सने वेगवेगळ्या कमेंट्स केल्या.


काय झाले नेमके?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन हेल्पच्या ट्विटर हॅंडलवर आदिती नावाच्या एक मुलीने लिहिले की, हाय. अॅमेझॉन, तुम्ही स्वतःला जगातील सर्वात मोठी वेबसाईट म्हणवता पण तासंतास शोधल्यावरही मला माझ्या आवडीचे सामान मिळाले नाही. यावर अॅमेझॉनकडून रिप्लाय आला की, आम्ही ग्राहकांच्या गरजा जाणतो आणि उपलब्ध सामानाची लिस्ट वाढवण्याचा वारंवार प्रयत्न करतो. तुम्ही सांगू शकाल का की तुम्हाला काय हवे आहे?


आदितीचे उत्तर


यावर आदितीने लिहिले की, बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए. यावर अॅमेझॉनचे ट्विटर अकाऊंट हॅंडल करणाऱ्या एका व्यक्तीने गाण्यातच या मुलीला उत्तर दिले. अॅमेझॉनकडून रिप्लाय आला की, ये अक्खा इंडिया जानता है, हम तुमपे मरता है. अॅमेझॉनचे हे उत्तर सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.



युजर्सच्या मजेशीर कमेंट


लोकांना अॅमेझॉनचा हा रिप्लाय खूप आवडला. एका युजरने कमेंट केली की, मस्त उत्तर. आज डाव उलटा पडला. तर अजून एकाने म्हटले की, अॅमेझॉन वाले दादा आमचीही सेटिंग करुन द्या. फ्लिपकार्डची शप्पथ सर्व प्रॉडक्ट अॅमेझ़ॉनवरुनच खरेदी करु.