मुंबई : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रसार रोखण्यासाठी देशात लॉगडाऊन-३ जारी करण्यात आला आहे. हे लॉकडाऊन १७ मेपर्यंत असणार आहे. लॉकडाऊनच्या काळात कामधंदा बंद आहे. अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा लोकांसाठी एसबीआयने खास कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. केवळ ४५ मिनिटात पाच लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकने याला तातडीचे कर्ज योजना म्हणून नाव दिले आहे. हे कर्ज घेण्याकरिता आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.  केवळ घरी बसून तुम्ही हे कर्ज घेवू शकता. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट  onlinesbi.com आणि sbi.co.in यावर अधिक माहिती देण्यात आली आहे. तसेच YONO अॅपच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करु शकता. या कर्जावर बँकेने व्याज दरही कमी ठेवला आहे. १०.५ टक्के व्याज दर ठेवला आहे. तसेच  सहा महिन्यानंतर तुमचे कर्जाचे हप्ते सुरु होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोरोना संकटात दिलासा मिळेल.


लोन घेण्यापूर्वी हे काम करा


 मात्र लोनचा अर्ज करण्यापूर्वी आपण 567676 वर एसएमएस पाठविण्याची गरज आहे. एसएमएसचा फॉर्मेट या प्रकारचा असेल<PAPL>(Space)<last four digit of your SBI account number>.  त्यानंतर आपल्याला एसएमएसला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यावरुन आपल्याला बँक किती कर्ज देणार आहे, याची माहिती मिळेल.


लोन घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा


आपल्या  मोबाइल फोनमध्ये योनो एसबीआय अॅप डाउनलोड करा.
प्री-अॅप्रुव्ड लोन वर क्लिक करा.
लोनचा कालावधी आणि रक्कम भरा.
एसबीआयकडून आपल्याला रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
त्यानंतर ओटीपीचा सबमिट करा.
ओटीपी सबमिट केल्यानंतर आपल्या खात्यात लोनची रक्कम ट्रान्सफर केली जाईल.