Amit Shah Ambedkar controversy : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मंगळवारी लोकसभेमध्ये भाषणादरम्यान भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात केलेल्या विधानावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झालंय. आज हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच काँग्रेस नेते त्यांनी अमित शाह यांना लक्ष्य करत घोषणाबाजी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून काँग्रेस पक्षावर पलटवार करण्यात आला. अमित शहा म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्वत:ला भारतरत्न दिला आहे. सत्य बाहेर येत असताना तो संभ्रम पसरवत आहे. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून गांधी घराण्यापर्यंत सर्वांना लक्ष्य केले आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा हवाला देऊन काँग्रेसला आंबेडकरविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, काँग्रेस पुन्हा आपल्या जुन्या धोरणावर आली आहे. काँग्रेसने माझे अपूर्ण वक्तव्य पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते पुढे म्हणाले की, 'काँग्रेस आंबेडकर विरोधी पार्टी आहे. काँग्रेस सावकरांचा अपमान केला. काँग्रेस आरक्षणविरोधी पार्टी आहे. काँग्रेसने आणीबाणी आणून राज्यघटना फाडली. लष्कराचा अपमान केला. भारताची सीमा तोडून परदेशात देण्याचे धाडस केले.'


गौरव यात्रेच्या 75 वर्षांवर सभागृहात चर्चा झाली. काँग्रेसने ज्या प्रकारे वस्तुस्थितीचा विपर्यास केला त्याचा मी निषेध करतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. 1951-52 च्या निवडणुकीत काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले. काँग्रेसने स्वत:ला भारतरत्न दिला, पण बाबासाहेबांना दिला नाही.


अमित शहा म्हणाले, काँग्रेस बाबासाहेबांना भारतरत्न देण्याच्या विरोधात आहे. काँग्रेसने संविधानाला विरोध आणि बाबासाहेबांचा विरोध सुरूच ठेवला. देशात नेहरू, इंदिरा, राजीव यांची अनेक स्मारके बांधली, पण आंबेडकरजींचे स्मारक बांधले गेले नाही.पंतप्रधान मोदींच्या सरकारने बाबासाहेबांचे पंचतंत्र विकसित केले. नागपुरात दीक्षाभूमी विकसित केली. 19 नोव्हेंबर 2015 रोजी पंतप्रधानांनी संविधान दिन घोषित केला, असंही ते म्हणाले. 



अमित शाह नेमकं काय म्हणाले?


"आता एक फॅशन झाली आहे. आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर... एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर स्वर्ग लाभला असता," असं अमित शाहांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधताना लोकसभेतील भाषणाच्या सुरुवातीला म्हटलं. याच मुद्द्यावरुन आता विरोधकांनी अमित शाहांवर टीकेची झोड उठवली आहे. ज्या पद्धतीने अमित शाहांनी अनेकदा आंबेडकरांचं नाव घेतलं ते अपमानास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अमित शाहांच्या या विधानाचा व्हिडीओ विरोधकांकडून व्हायरल केला जात आहे.