नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज भाजप अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. त्यासाठी नारायण राणे आता दिल्लीत दाखल झाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात घटस्थापनेच्या दिवशी राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी राजकारणाची दिशा जाहीर करू असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.  


त्यानंतर नारायण राणे यांनी अमित शाह यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना आज संध्याकाळची वेळ मिळलीय. त्याच बैठकीत राणेंच्या भाजप प्रवेशाची तारीख ठरण्याची शक्यताय आहे.