राज्यसभेत Sanjay Raut VS Amit Shah `सामना`, `आँख में आँख`वरून रंगली जुगलबंदी
राज्यसभेत आज संजय राऊत यांनी सरकारवर आरोप केले. त्यावर अमित शाहांनी ही उत्तर दिलं.
नवी दिल्ली : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काही ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन ही केले. पण आज जेव्हा संजय राऊत राज्यसभेत बोलण्यासाठी उभे राहिले. तेव्हा त्यांनी केंद्रीय यंत्रणावर टीका केली. यावर मग गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तर दिले. (Amit Shah Answer to sanjay raut in Rajyasbha)
ईडी कारवाईनंतर राऊतांचा आक्रमक पवित्रा
केंद्रीय यंत्रणांकडून कायद्याचा दुरूपयोग होत असल्याची घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत बोलताना केली. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक झालेले दिसले. राज्यसभेत नव्या कायद्यावर बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
राऊतांचा तिखा सवाल
संजय राऊत म्हणाले की, 'मी गृहमंत्र्यांचा आभारी आहे. कायद्याचा गैरवापर होणार नाही असे गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं, पण तुम्ही डोळ्यात डोळे घालून म्हणू शकता का कायद्याचा गैरवापर होत नाहीये.'
अमित शाहांचा करारा जवाब
अमित शाह म्हणाले की, 'एका मान्यवरांनी म्हटलं की, तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का? मी तर नक्कीच देऊ शकतो. जर कोणी डोळ्यात डोळे घालून विचारण्याची हिंमत ठेवत असेल. माझ्या मनात चोर नाही आहे. आम्ही तेच करतो. जी आमची आत्मा सांगते. आणि आम्ही तेच करतो ज्यांची आत्मा कायद्याची आत्मा मानते.'
दरम्यान आज संजय राऊत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे आभार मानले आहेत. पवारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. राऊतांवर अन्याय होत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.