श्रीनगर: जम्मू कश्मीरमध्ये शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच आहे त्याशिवाय अमरनाथ यात्रावेळी परिस्थिती अधिक चिघळू शकते, अशा पार्श्वभूमीवर पीडीपी सोबत भाजपची भूमिका काय असावी? यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जम्मु कश्मीर सरकारमधील भाजप मंत्र्यांची बैठक दिल्लीत आयोजित केली आहे. भाजप मुख्यालयात ही बैठक होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. दहशतवाद्यांकडून समाजातील प्रतिष्ठीत लोकांना लक्ष केलं जातंय. रायजींग कश्मीर संपादकांची हत्या झाली, यावरही भाजपचे मंत्री आपले मत व्यक्त करणार आहेत.


बैठकीकडे सर्वांचे लक्ष... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शाह यांनी जम्मू कश्मीर मुद्द्यांवर सर्व भाजप मंत्र्यांना पहिल्यांदाच दिल्लीत बोलवून बैठक आयोजित केली. या बैठकीकडे लक्ष लागले आहे. बैठकीआधी अमित शाहांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे.


दहशतवादी कारवाया वाढल्या


दरम्यान, केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचं सरकार असताना अतिरेकी हल्ल्यांमध्ये कमालीची वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. रमजान महिन्यात लष्करानं शस्त्रसंधी जाहीर केली खरी, मात्र या काळात अतिरेकी कारवाया मात्र वाढल्या. एकीकडे काश्मिरी बुद्धिजीवींना लक्ष्य करतानाच औरंगजेबसारख्या जवानाला छळ करून मारण्यात आलं. मात्र लष्करानं पुन्हा एकदा ऑपरेशन ऑल आऊट सुरू केलंय. पहिल्याच दिवशी याची चुणुक दिसली...