नवी दिल्ली : २०१४ पासून अस्थिरतेच्या युगाचा अंत झाला असून देशाची आर्थिक स्थिती सुधारल्याचे विधान भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. मोदी सरकारला सत्तेत येऊन आज ४ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  गरीब जनतेच्या जीवनात परिवर्तन येत असून पंतप्रधान मोदींमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याचे त्यांनी सांगितले. लोक मोदींच्या नेतृत्वात विश्वास ठेवतील आणि २०१९ साली पुन्हा भाजपाला बहुमत मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.