नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांच्यात कमालीचे साम्य आहे. जिंकण्यासाठी हे दोन्ही नेते कोणत्याही थराला जायला तयार असतात, असे विधान प्रसिद्ध लेखक व इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केले. रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी: द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड, १९१४-१९४८' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी दिल्लीत संपन्न झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी गुहा यांनी मोहम्मद अली जिना यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, जिना हे एक स्पष्टवक्ते आणि चाणाक्ष राजकारणी होते. पाकिस्तानची निर्मिती हेच त्यांचे एकमेव ध्येय होते. 


सध्याच्या घडीला जिनांच्या या व्यक्तीमत्वाची झाक अमित शहांमध्ये पाहायला मिळते. काहीही झाले तरी मला निवडणूक जिंकायचेच, असे शहा स्पष्टपणे सांगतात. एकेकाळी जिना यांनीदेखील काहीही होवो, कितीही जणांचा जीव जावो, मला स्वतंत्र पाकिस्तान हवाच, अशी भूमिका घेतल्याचे गुहा यांनी सांगितले.