भाषणादरम्यान अजान सुरु झाली अन् अमित शहा यांनी...VIDEO पाहा
भाषण सुरू असताना सुरु झालं अजान...अमित शहा यांनी जे केलं ते पाहून कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला,VIDEO पाहिलात का?
जम्मू-काश्मीर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांची एक सभा झाली आहे. या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मध्येचं अजान (Azaan) वाजली. ही अजान ऐकताच अमित शाह यांनी जे केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
अमित शहा (Amit Shah) बारामुल्ला येथे भाषण करत होते. यादरम्यान जवळच्या मशिदीत अजान (Azaan) सुरू झाली. अजानचा आवाज ऐकताच अमित शाह यांनी काही काळ भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर अमित शहांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
अमित शहा (Amit Shah) बारामुल्ला येथील उत्तर काश्मीर जिल्ह्यातील शौकत अली स्टेडियममध्ये भाषण करत होते. अर्धा तास चाललेल्या भाषणानंतर पाच मिनिटांनी अमित शहा थांबले. यावेळी त्यांनी मंचावर असलेल्यांना विचारले, "मशिदीत काही चालले आहे का?" यावेळी 'अजान' (Azaan) सुरू असल्याचं त्यांना स्टेजवर कुणीतरी सांगितले. यानंतर अमित शहांनी लगेचच आपलं भाषण थांबवलं. यानंतर सभेतून त्यांच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काही वेळाने त्यांनी स्टेजवरूनच जनतेला विचारून पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी विचारले, आपण आपले भाषण चालू ठेवू शकतो का? यावर जनतेने होकार दिल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणास सुरुवात केली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाषण केले. दरम्यान मध्येच भाषण थांबवल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.