मुंबई : सोशल मीडिया गृहमंत्री अमित शाह यांच्या तब्बेतीबाबत एक ट्विट व्हायरल होत होते. या ट्विटमध्ये अमित शाह यांना हाडाचा कॅन्सर झाल्याचं म्हटलं होतं. सोबतच रमजान महिना असल्यामुळे त्यांच्या तब्बेतीसाठी प्रार्थना करा असा मजकूर या ट्विटमध्ये लिहिलं होतं. या ट्विटचा खुलासा स्वतः अमित शाह यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शाह यांनी ट्विट करून आपली तब्बेत एकदम ठणठणीत बरी असल्याच सांगितलं आहे. त्यांनी ट्विट करून आपल्या तब्बेतीबाबत अफवा पसरवली जात असल्याचं सांगितलं. 



या ट्विटमध्ये अमित शाह यांनी म्हटलं आहे की,'गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या तब्बेतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. एवढंच नव्हे तर अनेकांनी माझा मृत्यू झाल्याचं देखील म्हटलं आहे. संपूर्ण देश जागतिक साथीच्या रोगाशी लढत आहे. यामध्ये खूप उशिरापर्यंत काम करत असल्यामुळे मी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र ही गोष्ट समोर आल्यावर मी याबाबत बोलण्याचा निर्णय घेतला.'


अमित शाह यांनी स्वतः ट्विट करून याबाबत मी खुलासा केला. अमित शाह यांची तब्बेत ठणठणीत बरी झाली आहे. मी बरा आहे. मला कोणताच आजार झालेला नाही.