मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस यांच्यात नव्याने ऋणानुबंध जुळण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस पक्षात सर्वोच्च असलेल्या गांधी घराण्याचे एकेकाळचे अत्यंत घनिष्ठ आणि माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे मित्र अशी बच्चन यांची ओळख होती. मात्र, '१९८७'मध्ये झालेल्या 'बोफोर्स' कांडात नाव आल्यानंतर बच्चन आणि गांधी घराण्यात अंतर पडले. त्यातून बच्चन यांनी काँग्रेससोबत फारकखत घेतली. त्याला आता अनेक वर्षे लोटली असली तरी, त्यांच्यात पुन्हा एकदा नव्याने सूर जुळण्याची चिन्हे दिसत आहेत. ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे बिग बी बच्चन यांनी ट्विटरवरून जोडलेले काँग्रेस कनेक्शन.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ज्या ट्विटर अकाऊंटवरून ही प्रतिक्रीया देण्यात आली आहे ते काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट आणि काँग्रेसचे अकाऊंट फॉलो करणारे बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट अशी दोन्ही अकाऊंट्स अधिकृत (ब्लू टीक) दाखवत आहेत. मात्र, दोन्ही अकाऊ्ट्सची फॉलोअर्स संख्या पाहता त्याच्या अधिकृततेबद्धल शंका घेऊन, प्रश्नचिन्ह उपस्थीत केले जात आहे. दोन्ही अकाऊट्सच्या अधिकृततेची झी २४ तास पुष्टीकरत नाही.


बिग बींनी काँग्रेसला केले ट्विटरवर फॉलो


बच्चन यांनी काँग्रेसला ट्विटरवर फॉलो केले. त्यानंतर काँग्रेसनेही लागलीच प्रतिसाद देत बच्चन यांचे स्वागत केले. काँग्रेसने ट्विट केले आहे की, 'फॉलो केल्याबद्धल धन्यवाद! आम्ही आपल्याला '१०२ नॉट आऊट'साठी ऑल द बेस्ट म्हणतो. आता आमच्याकडे हा क्षण साजरा करण्यासाठी आणखी एक कारण आहे. ते म्हणजे आता आमचे फॉलोअर्स ४ मिलियन इतके झाले आहेत. सर्वांना धन्यवाद!. बोफोर्स प्रकरणानंतर गांधी-बच्चन कुटुंबात संपलेले नाते पुन्हा एकदा नव्याने जुळण्याची शक्यता या निमित्ताने पुन्हा एकदा वर्तवली जात आहे.



अंतर पडले पण मैत्र कायम


१९८४ मध्ये त्या काळातला अॅंग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी ८ व्या लोकसभेसाठी काँग्रेसच्या तिकीटावर अलाहबाद मतदार संघातून निवडणुक लढवली. त्यात ते विजयीसुद्धा झाले. बच्चन आणि गांधी कुटुंबियांमध्ये अत्यंत घनिष्ठ नाते होते. अगदी १९८७मध्ये बोफोर्स प्रकरण घडल्यावर दोन्ही परिवारात अंतर आले खरे. पण, बच्चन आणि राजीव गांधी यांच्यातील मैत्र कायम राहिले. पण, १९९६मध्ये दोन्ही कुटुंबात पूर्णपणे दरी पडली. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांमधली दरी कायम आहे.


बच्चन साहेबांचे फॉलोईंग आणि काँग्रेसचे ट्वीट यावर ट्विटर यूजर्सची  प्रतिक्रिया