तामिळनाडू राज्यातील एन्नोर मध्ये गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे.उत्तर चेन्नई मधील एक फर्टिलायजर मॅन्युफॅक्चरिंग यूनिट मधून अमोनिया गॅस गळती झाल्यानंतर 25 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना 26 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास 11.45 वाजता घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस गळती झाल्यानंतर चिन्ना कुप्पम, पेरिया कुप्पम, नेताजी नगर आणि बर्मा नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.पसरलेल्या दुर्गंधीमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता.अनेकांच्या छातीत जळजळ होत होती. गॅस गळती झाल्याची माहिती अनेक लोकांना न मिळाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. 


गॅस गळतीची माहिती मिळताच, परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते.अनेक लोक आपल्या घरातून निघून रसत्यावर एकत्र होऊन मदत मागत होते.मॅन्युफॅक्चरिंगच्या जवळपास असणाऱ्या पेरिया कुप्पम भागात राहणारे काही नागरिक बेशुद्ध झाले होते,त्यांना जवळच्या रुग्णालयात नेहून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.अनेक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यास अडचण निर्माण होत होती.त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्याले रिक्षा आणि बाईकवरून लोकांना रुग्णालयात दाखल केले.


फर्टीलाइजर कंपनी यांच्या आधिकाऱ्यांनी निर्माण झलेली समस्या मिटवण्यासाठी जलद गतीने पाऊले उचलले होती.पोलिसांनी रसत्यावर एकत्र झालेल्या लोकांना शांत राहण्याचे अवाहन केले. झालेल्या घटनेची चौकशी चालू आहे असे सांगून त्यांनी लोकांना घरी जाण्याची विनंती केली.कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील आत्ता गॅस गळती होत नाही अशी माहिती देत लोकांना घरी जाण्याची विनंती केली. पोलिस उप-महानिरीक्षक विजयकुमार यांनी देखील लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर लोक घरी निघून गेले.डॉक्टरांची आणि पोलीसांची टीम तिथे उपस्थित होती. 


बुधवारी सकाळी कंपनीच्या परिसरात मोठ्या संख्येने लोक एकत्र होत प्लांट कायमचे बंद करण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, मोठ संकट निर्माण झाले आहे अशी भावणा त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने तातपूरता बंद करण्याचे आदेश दिले आहे.