Anant Ambani and Radhika merchant wedding date : बिझनेसमॅन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा सगळ्यात लहाण मुलगा अनंत अंबानी अनेकदा चर्चेत असतो. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात अनंतचा त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चेंटसोबत साखरपुडा झाला. तेव्हापासून ते दोघे सगळ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. त्या दोघांना एकत्र पाहिलं की सगळ्यांना आश्चर्य होतं. अनेकांना राधिका आणि अनंतची जोडी आवडली. तर त्या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाच्या तारखेच्या घोषणेची प्रतिक्षा करत असताना, आता त्यांच्या आनंदाची बातमी समोर आली आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या तारखेची अखेर घोषणा करण्यात आली आहे. 


'या' दिवशी अडकणार लग्न बंधनात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबानी कुटुंबाच्या फॅन पेजनं दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी त्यांचा लहाण मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केली आहे. रिपोर्ट्सनुसार, पुढच्या वर्षी म्हणजे 10,11, 12 जुलै 2024 मध्ये ते लग्न बंधनात अडकणार आहेत. ही बातमी ऐकल्यानंतर अंबानी कुटुंबाच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. कारण ते गेल्या अनेक दिवसांपासून अनंत आणि राधिकाच्या लग्नाची प्रतिक्षा करत होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या वर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं अंबानी कुटुंबानं एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या या कार्यक्रमात ग्लॅमरच्या क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली होती. मात्र, या कार्यक्रमात सगळ्यांचे लक्ष हे अनंत अंबांनी आणि राधिका मर्चेंटनं वेधलं. तर एकदा राधिका मर्चेंट आणि श्लोका मेहता यांनी पापाराझींना पोझ दिल्या. तर त्याशिवाय नीता अंबानी या त्यांच्या दोन्ही सुनांसोबत पापाराझींसमोर पोझ देताना दिसल्या. 


हेही वाचा : आईला व्हायचं होतं हिरोईन अन् वडील गेले दारूच्या आहारी; आलियाने सांगितला 'तो' किस्सा


यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात राधिका आणि अनंत यांनी अंबानी निवास म्हणजेच 'एंटीलिया' मध्ये जवळच्या लोकांच्या उपस्थितीत गुजराती परंपरेनुसार साखरपुडा केला. साखरपुड्यासाठी राधिकानं लोकप्रिय डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला लेहेंगा परिधान केला होता. तिचा हा गोल्डन लेहेंगा लक्षवेधी होता. तिनं तिचा लूक खुलवण्यासाठी सेम ओढणी आणि वेस्ट बेल्ट परिधान केला होता. त्यासोबत दागिन्यांमध्ये स्टेटमेंट डायमंड नेकलेस, कानातले, बांगड्या आणि बिंदी एक्सेसईज म्हणून वापरली होती. अनंतनं निळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. ते दोघे अनेकदा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.