Anantnag Encounter: जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधील अनंतनाग येथे 13 सप्टेंबरपासून सुरु असणारा दहशतवाद्यांसोबतचा संघर्ष सहाव्या दिवशीही सुरुच आहे. आतापर्यंत या कारवाईमध्ये लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील तीन बड्या अधिकाऱ्यांना वीरमरण आलं तर, एका जवानानंही यात प्राण गमावले. गडोले कोकरनागमध्ये सुरु असणाऱ्या या संघर्षामध्ये आता लष्कराच्या विशेष तुकड्यांचीही मदत घेतली जात आहे. कोकरनाग भागामध्ये दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर लष्कराची नजर असून आता त्यांचा खात्मा करण्यासाठीच सर्वजण सज्ज आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकृत माहितीनुसार या भागात फक्त गोळीबारच नव्हे, तर ब़ॉम्बहल्लेही सुरुच आहेत. पण, सहाव्या दिवसापर्यंत आलेला हा संघर्ष अद्याप निकाली निघाला कसा नाही? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. 


दहशतवाद्यांवर हल्ल्यावर हल्ले.... 


सूत्रांच्या माहितीनुसार सदर भागामध्ये असऱ्या गुहांमध्ये संरक्षण दलानं आग लावली होती. जिथं धुरामुळं गुदमरणारे दहशतवादी बाहेर येताक्षणी त्यांचा खात्मा करता येऊ शकतो. आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात झालेल्या दहशतवादी आणि लष्करातील संघर्षाच्या कारवायांमध्ये दीर्घकाळासाठी सुरु राहिलेसी ही पहिलीच कारवाई ठरत आहे. सध्याच्या घडीला या कारवाईमध्ये संरक्षण यंत्रणांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आता पीर पंजाल पर्वतरांगांवरूनही मारा वाढवला आहे. 


हेसुद्धा वाचा : आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन; काय आहे यामागाचा हेतू? तुम्हाला हे माहित असायलाच हवं 


 


शेवटच्या क्षणी लष्कराच्या हालचालींना वेग 


अनंतनागमध्ये सुरु असणाऱ्या लष्करी कारवाईला प्रत्यक्षात उतरवत असताना कोकरनागमध्ये लष्करानं एक कमांड सेंटर सुरु केलं असून, तिथून या कारवाईबाबत क्षणाक्षणाची माहिती मिळत आहे. रविवारी सैन्याकडून दहशतवाद्यांचं LIVE LOCATION ट्रॅक करण्यात आलं. ज्यानंतर ते लपून बसलेल्या ठिकाणांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. यावेळी रॉकेट लाँचर आणि ग्रेनेडचाही हल्ला चढवण्यात आला. 


दहशतवादी अनंतनाग कोकरनागमधील ज्या घनदाट वनांमध्ये लपून राहिले आहेत तिथं त्यांचा मागोवा घेणं आव्हानात्मक आहे. शिवाय ते नेमके कोणत्या गुहेत लपून बसले आहेत याचासुद्धा थांगपत्ता लावणं कठीण झालं आहे. त्यामुळंच आतापर्यंत या दहशतवाद्यांचा खात्मा करता आलेला नाही. तिथं भारतीय लष्कराची ताकद पाहता सध्या लाँच पॅडवर ही अनेक दहशतवादी हजर झाले असून त्यांना सर्जिकल स्ट्राईकची भीती सतावत आहे. एकंदरच काश्मीर खोऱ्याला सध्या छावणीचं रुप प्राप्त झालं असून आता प्रतीक्षा अंतिम प्रहाराचीच आहे.