Ayodhya Ram Mandir Photos: अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाचे काम प्रगतीपथावर आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असतानाच प्राचीन अवशेष सापडले आहेत. यात अनेक मूर्ती आणि स्तंभ यांचा समावेश आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडियावर या प्राचीन अवशेषांचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. चंपत राय नेहमीच राम मंदिरासंदर्भात फोटो शेअर करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंपत राय यांनी शेअर केलेल्या फोटोत एकाच ठिकाणी सुमारे डझनभर अवशेष ठेवण्यात आले आहेत. यात अनेक मूर्ती आणि स्तंभांचा समावेश आहे. मंदिराच्या बांधकामासंदर्भात खोदकाम सुरू असताना या सर्व वस्तू सापडल्या आहेत. सापडलेल्या अवशेषांवर काही ठिकाणी देवी-देवतांची कलाकृतीदेखील असल्याचे दिसत आहे. खोदकामा संदर्भात सापडण्यात आलेले हे प्राचीन अवशेष मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहेत. 


दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार जेव्हा मंदिराचे बांधकाम सुरू झाले होते. तेव्हा जवळपास 40 ते 50 फूट खोदकाम करण्यात आले होती. मंदिर परिसरातच खोदकाम सुरू असताना या वस्तू सापडल्या आहेत. या प्राचीन वस्तू सापडल्यामुळं हिंदू पक्षाचा दावा अधिक मजबूत झाला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्व्हेमध्येही अशाचप्रकारचे शिलालेख सापडले होते. मंदिर-मशीद प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टातही याचा उल्लेख करण्यात आला होता. 



राम मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. मंदिराचा पाया जवळपास पूर्ण झाला असून जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केल्यांनंतरही मंदिराचे काम सुरू राहणार आहे. राम मंदिर ट्रस्टसंबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराचे काम 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. जानेवारीपर्यंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल त्यानंतर भाविक दर्शनासाठी येऊ शकतात. म्हणजेच या वर्षाअखेरीस भक्त राम मंदिरात दर्शनासाठी येऊ शकतात. 


 कसं असेल राम मंदिर?


मागील महिन्यात राम मंदिर ट्रस्टकडून बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिराचा फोटो शेअर करण्यात आला होता. यात मंदिराचा फ्रंड लूक दाखवण्यात आला होता. तर, मंदिरातील आतील बाजूही दिसत होती. अयोध्येत भव्य-दिव्य मंदिराचे निर्माण होत आहे. तर, पुढील 1 हजार वर्षांपर्यंत मंदिराला कोणताचा धोका निर्माण होऊ शकत नाहीये.


राम मंदिराची सुरक्षा वाढवली


राम जन्मभूमीच्या सुरक्षेत मोठे बदल करण्यात आले आहेत. याता मंदिराची सुरक्षा SSF सांभाळणार आहेत. अलीकडेच उत्तर प्रदेश सरकारने या टीमची बांधणी केली होती. या टीममध्ये उत्तर प्रदेश पोलिस आणि पीएससीचे सर्वश्रेष्ठ जवानांचा समावेश असेल. तसंच, त्यांना विशेष सुरक्षेसाठी ट्रेनिंगही देण्यात आली आहे. SSFची बटालियन अयोध्येला पोहोचली आहे.