आंध्र प्रदेश : स्कूल बस आणि रिक्षामध्ये टक्कर झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील क्रिष्णा जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. यामध्ये २ जण ठार तर ७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार स्कूल बस आणि भरधाव येणाऱ्या रिक्षामध्ये जोरदार टक्कर झाली. यात दोघांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले.


जखमींवर उपचार 



जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबद्दल पोलीस अधिक तपास करीत आहेत.


नेमकी चुक कोणाची होती याबद्दल अजून माहिती मिळू शकली नाही.