आंध्र प्रदेश : देश प्रगतीची अनेक पावले पूढे चालला असला तरी अंधश्रद्धेत अजूनही गुरफटलेलाच आहे. कारण अनेक ठिकाणी काळी जादू आणि जादू टोण्यासारख्य़ा घटना आजही घडतात. अशाच एका जादू टोण्याच्या प्रयोगाने निष्पाप चिमुकल्या मुलीचा बळी गेल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील पेरारेड्डीपल्ली गावात एक वडिल आपल्या जुळ्या मुलींसोबत राहत होता. बुधवारी वडिलाने विधीच्या नावाखाली घरात जादूटोणा करत होता. वडिलाने आपल्याच 3 वर्षीय़ मुलीवर जादूटोण्याचा प्रयोग केला. या प्रयोगात त्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  


असा केला जादूटोणा 
आरोपीने वडिलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, जादू टोण्याच्या विधीद्वारे त्याला वाईट शक्तींना दूर घालवून आपल्या व्यवसायात नफा कमवायचा होता. सूत्रांच्या माहितीनूसार जादूटोण्याचा भाग म्हणून त्याने आपल्या मुलीवर हळदीचे पाणी ओतले आणि नंतर तिच्या तोंडात कुमकुम पावडर भरली. ज्यामुळे मुलीचा श्वास गुदमरला होता. 


दरम्यान मुलीचा रडण्याचा आवाज ऐकूण शेजाऱ्यांनी तिची सुटका केली आणि तिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी चेन्नईतील दुसऱ्या रुग्णालयात पाठविले होते. मात्र गूरूवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. 


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वेणुगोपाल यांचा व्यवसाय होता, ज्यामध्ये त्यांना खूप नुकसानीचा सामना करावा लागला होता. या नुकसानीत बाहेर पडण्यासाठी त्यांनी जादू टोण्याचा प्रयोग केला होता.  


दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलाला ताब्यात घेतले आहे. वेणुगोपाल असे या आरोपीचे नाव आहे.  त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.