नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारें दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. मात्र, त्याआधीच त्यांनी सरकारवर आंदोलकांना रोखल्याचा गंभीर आरोप केला. आंदोलनासाठी दिल्लीत येणाऱ्या आंदोलकांच्या बसेस आणि रेल्वे गाड्या मुद्दाम रोखल्या जात असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं. तर जलसंपदामंत्री गिरीष महाजनांनी अण्णांनी केलेले  आरोप नाकारले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलकांना कुठल्याही प्रकारचा मज्जाव करण्यात आलेला नाही असं महाजनांनी स्पष्ट केलंय.  त्याचप्रमाणे आंदोलन मागे घेण्याची त्यांनी विनंती केली. लोकपाल कायद्याची तातडीनं अंमलबजाणी करावी ही अण्णांची प्रमुख मागणी आहे. 


उपोषण सुरू करण्याआधी अण्णांनी दिल्लीतल्या राष्ट्रपिता महत्मा गांधींच्या समाधीवर जाऊन आदरांजली अर्पण केली. काही वेळ ध्यान केल्यावर अण्णा पुढच्या कार्यक्रमसाठी रवाना झाले.