लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये भाजपला एकामागून एक असे जोरदार धक्के बसत आहेत. लोकसभा पोटनिवडणूकीत झालेल्या दारूण पराभवानंतर उत्तर प्रदेश भाजपच्या एका बड्या नेत्याच्या जावयाने कमळाची साथ सोडत समाजवादी पक्षाच्या सायकलचा हॅंडल पकडला आहे.


स्वामी प्रसाद मौर्य योगी सरकारमध्ये सहकार मंत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील भाजप सरकारमध्ये सहकार मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांचे जावई नवल किशोर यांनी शनिवारी भाजपच्या कमळाची साथ सोडत समाजवादी पक्षात प्रवेश केला. या वेळी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, माजी मंत्री आजम खान, यांच्यासह समाजवादी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. उल्लेखनीय असे की, स्वामी प्रसाद मौर्य हे एकेकाळी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षचे वरिष्ठ नेते होते. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी बसपला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.


बसपच्याही काही नेत्यांचा सपात प्रवेश


नवल किशोर यांच्यासोबत बसपाचे माजी आमदार इरशाद खान आणि माजी एमएलसी प्रदीप सिंह यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यावर पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी तिघांनाही गौतम बुद्धांची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले.