अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरातील मेट्रोनं अजून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. सिताबर्डी ते झिरो माईल स्टेशन दरम्यान मेट्रोनं धाव घेतली आहे. पहिल्यांदाचा या मार्गावर मेट्रोनं धाव घेत असताना सीताबर्डी ते झिरो माईल दरम्यान शहीद गोवारी उड्डाणपुलाच्या वरून मेट्रो धावली आहे. लोकमान्य नगर आणि सुभाष नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ट्रायल रन 30 मेला पार पडल्यानंतर मेट्रोनं सिताबर्डी ते झिरो माईलचा हा महत्वाचा टप्पा  गाठला आहे. महत्वाचं म्हणजे मेट्रोनं क्रॉस ओव्हर केलं असून डाउन मार्गाने जाणाऱ्या ट्रेनने अप मार्गावर देखील प्रवास केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पहिल्यांदाच या प्रकारचा प्रवास मेट्रो ट्रेनने केला आहे. त्यामुळं अप मार्गावरील मेट्रो ट्रेनचे आवागमन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे .अप मार्गावरील वाहतूक सुरु झाल्यामुळे मेट्रोच्या प्रवासी फेऱ्यामध्ये वाढ होणार आहे. नागपूर मेट्रोनं अजून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. सिताबर्डी ते झिरो माईल स्टेशन दरम्यान मेट्रोनं धाव घेतली आहे. लोकमान्य नगर आणि सुभाष नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ट्रायल रन 30 मेला पार पडल्यानंतर मेट्रोनं सिताबर्डी ते झिरो माईलचा हा महत्वाचा टप्पा गाठला आहे. यामुळे आता अप मार्गावरील मेट्रो ट्रेनचे आवागमन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. अप मार्गावरील वाहतूक सुरु झाल्यामुळे मेट्रोच्या प्रवासी फेऱ्यामध्ये वाढ होणार आहे.