बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आज एसआयटीने (विशेष तपास पथकाने) आणखी एकाला अटक केली. या व्यक्तीला दक्षिण कन्नाडा येथून अटक करण्यात आली. मोहन नायक, असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहन नायकला एसआयटीने स्थानिक न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला सहा दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘लंकेश पत्रिका’या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. नरेंद्र दाभोळकर, क्रॉ. गोविंद पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय.


गौरी लंकेशयांचे राजराजेश्वरी भागात घर असून तिथेच त्यांच्यावर रात्री ८ वाजताच्या सुमारास हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या वर्मी लागल्याने त्या जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले होते.