Tattoo and Government Job: टॅटू हे एक फॅशन स्टेटमेंट आहे. तरुणाईसोबतच आता पौढांनाही टॅटूचे वेड लावले आहे. अनेकजण आपल्या आयुष्यातील खास क्षणांचे टॅटू काढून घेतात. पण बऱ्याचदा असा सवाल उपस्थित होतो की, टॅटू काढलेला असताना सरकारी नोकरी मिळते का? किंवा सरकारी नोकरी करत असताना टॅटू काढण्याची परवानगी देण्यात येते का? असे अनेक प्रश्न मनात घोळत असतात. तर, आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. जाणून घेऊया अशा कोणत्या नोकऱ्या आहेत जिथे शरीरावर टॅटू गोंदवला असेल तर नोकरी मिळणे अवघड होऊन बसते. 


या नोकऱ्यांमध्ये टॅटू काढण्यास मनाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील असे काही कार्यालय व पदे आहेत त्यावर कार्यरत असताना टॅटू काढण्यास मनाई केली आहे. त्याची यादी पुढील प्रमाणे, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, भारतीय सेना, भारतीय नौदल, पोलीस. जर तुम्हाला यापैकी कोणत्या क्षेत्रात जायचे असेल तर टॅटू काढू नका किंवा आधीच टॅटू काढला असेल तर लेझरच्या मदतीने काढून टाका. 


ट्रायबल कम्युनिटी


काही नोकऱ्यांमध्ये जर उमेदवार आदिवासी समुदायातील असेल तर टॅटू काढण्याची परवानगी असते. पण तो टॅटू लहान असावा आणि समाजाशी संबंधित असेल तरच त्याची परवानगी देण्यात येते. जर टॅटू फॅशनेबल असेल किंवा कोणाच्या भावना दुखावणारे असतील तर त्याला परवानगी मिळत आहे. 


बहुंताश ठिकाणी टॅटूसंदर्भात पॉलिसी असेल आणि उमेदवार नोकरीसाठी गेला तर अशावेळी त्याला नोकरी मिळण्यास अडचण येते. यात एअरफोर्स, इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड, डिफेंन्समध्ये शरीरावर कुठेही टॅटू असेल तरीदेखील नोकरी मिळत नाही. 


या क्षेत्रातही नाही मिळत नोकरी


आरोग्यसेवा, कायदेसंस्था, प्रशासकीय सहाय्यक, वित्तीय संस्था, शिक्षक, बँका ही अशी काही क्षेत्रे आहेत जिथे टॅटू असलेल्या लोकांना एकतर नोकरी मिळत नाही किंवा मोठ्या अडचणीने निर्माण होतात.