लडाख : लडाखमध्ये २६ जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडली आहे. या अपघातात लष्कराच्या सात जवानांचा मृत्यू झालाय. अनेक जवान जखमी झाले आहेत. अपघातानंतर जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या या दुर्घटनेत 7 जवानांना आपला जीव गमवावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थॉईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर हा अपघात झालाय. लष्कराची बस 50-60 फूट खोलवर श्योक नदीत कोसळली. ज्यामध्ये लष्कराचे सर्व जवान जखमी झाले. सर्व जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आणि लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली.


गंभीर जखमी जवानांच्या मदतीसाठी हवाई दलाशीही संपर्क साधण्यात आला आहे. त्यांना उपचारासाठी वेस्टर्न कमांडकडे पाठवले जाऊ शकते. लष्कराची बस कोणत्या कारणांमुळे रस्त्यावरून घसरली आणि नदीत पडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, सैनिकांची बस शिबिरातून सब सेक्टर हनिफच्या पुढे जाण्याच्या दिशेने जात होती, त्याचवेळी हा अपघात झाला.