जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान मरण पावलेल्या झूम कुत्र्याला भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादविरोधी कारवाईत जखमी होऊन मरण पावलेल्या झूम कुत्र्याला भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी शेवटचा निरोप दिला. शुक्रवारी पुष्पहार अर्पण सोहळा पार पडला. श्रीनगरमधील अॅडव्हान्स फील्ड व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना गुरुवारी झूमचा मृत्यू झाला.


तो कसा जखमी झाला?
जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान तो जखमी झाला होता. 10 ऑक्टोबर रोजी तांगपावा गावात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात त्याने सैन्याला मदत केली होती. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांची ठिकाणे ओळखण्यात झूमने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्यावर दोनदा गोळ्या झाडल्या हेत्या तरीही झूमने ऑपरेशन सुरू ठेवले होते आणि या ऑपरेशनमध्ये दुसऱ्या दहशतवाद्यालाही शोधून काढले.


लष्कराचा प्रशिक्षित कुत्रा 'झूम'
झूम हा ऑपरेशन तांगपावाच्या लढाऊ संघाचा एक भाग होता. दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान मरण पावलेल्या प्राणघातक कुत्रा झूमच्या पार्थिवावर भारतीय लष्कराच्या इतर लढाऊ कुत्र्यांनीही आपली श्रध्दांजली वाहीली. 29 आर्मी डॉग युनिटने जम्मूमध्ये भारतीय आर्मी डॉग 'झूम' ला शेवटचा निरोप दिला.


तुम्हाला ZOOM कोण आहे, हे माहित आहे का?
'झूम' हा उच्च प्रशिक्षित, क्रूर आणि वचनबद्ध कुत्रा आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.


अधिकार्‍यांच्या मते, झूम दक्षिण काश्मीरमधील अनेक सक्रिय ऑपरेशन्सचा एक भाग आहे. सोमवारी दहशतवादी लपलेले घर शोधण्याचे काम नेहमीप्रमाणे झूमला देण्यात आले होते, परंतु त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. शूर सैनिक 'झूम'ने गंभीर जखमी होऊनही आपले काम सुरु ठेवले, परिणामी दोन दहशतवादी ठार झाले.


आर्मी अ‍ॅसॉल्ट कॅनाईन 'झूम' ने कर्तव्य बजावताना आपला जीव दिला. 09 ऑक्‍टोबर 22 रोजी ऑपरेशन तांगपावा दरम्यान त्याला बंदुकीच्या गोळीने जखमा झाल्या होत्या. 'झूम'ने दहशतवाद्यांशी शौर्याने लढा देऊन सैनिकांचे प्राण वाचवक नि:स्वार्थी बांधिलकी आणि राष्ट्रसेवा सदैव स्मरणात राहिल.