तिरुवनंतपूरम : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात तिरूवनंतपूरमच्या न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे. हिंदू महिलांवर मानहानी केल्याचा आरोप शशी थरूर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शशी थरूर यांनी आपल्या पुस्तकात महिलांचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या आरोपनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने थरुर यांच्याविरोधात नोटीस जारी केली होती. पण ते स्वतः कोर्टात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे ते वादात सापडले होते. या अटक वॉरंटनंतर थरूर पुन्हा अडचणीत सापडले आहेत.



न्यायालयाकडून आलेल्या समन्समध्ये कधी उपस्थित राहावे याचा नेमका उल्लेख नव्हता, अशी माहिती थरुर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे, अलीकडेच साहित्य अकादमीने इंग्रजीसाठी शशी थरूर यांना ‘एन एरा ऑफ डार्कंनेस’साठी पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून पुस्तक लिहिण्यास सुरूवात करणाऱ्या थरूर यांनी आतापर्यंत २४ पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.