नवी दिल्ली : नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. मात्र, ही दोन हजार रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवासांपासून होत आहे. या प्रकरणी आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाष्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आलेली दोन हजार रुपयाची नोट बंद होणार ही निव्वळ अफवा असून त्यावर विश्वास ठेऊ नका असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलंय. 


गेल्या काही दिवसांपासून ही नोट बंद होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत जेटलींनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय.


२००० रुपयांची नोट बंद होणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र, ही केवळ अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.



गुजरात | २००० च्या नोटबंदीची निव्वळ अफवा