नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानविरूद्ध निर्णायक लढाई जिंकण्यासाठी भारत सर्वोतोपरी प्रयत्न, रणनिती किंवा इतर उपाययोजनांचा वापर करेल असे अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी शु्क्रवारी जागतिक व्यापार परिषद बोलताना सांगितले. पाकिस्तानचा दृष्ट देश असा उल्लेख करत त्यांनी पुलवामा हल्ला करणाऱ्या दोषींनी स्वत: या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असतानाही पाकिस्तान दोषींविरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याचे जेटलींनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाचा उल्लेख करत जेटलींनी पाकिस्तान सरकारने हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी योग्य ते पुरावे सादर करण्याचे सांगितले. त्यावर जेटली यांनी म्हटले की, हल्ला करणाऱ्यांबाबत कोणतीही माहिती नसती तर पाकिस्तान सरकारला योग्य पुराव्यांची गरज असती परंतु तुमच्या देशात बसलेल्या व्यक्तीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचे त्यांनी म्हटले.


भारतात या हल्ल्याचा अतिशय संताप व्यक्त करत आहे. आतापर्यंत जीवनात अनेक युद्ध पाहिली आहेत, अनेक मानवी आपत्ती पाहिल्या, दहशतवाद्यांकडून करण्यात आलेली पंतप्रधानांची हत्या पाहिली आहे. परंतु, या हल्ल्याविरोधातील संताप अतिशय उफाळून आला आहे. पाकिस्तान आपल्या कुरापती थांबवण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे भारत ही निर्णायक लढाई जिंकण्यासाठी आपल्या सर्व राजकीय तसेच इतर सर्व संसाधानांचा वापर करणार असल्याचे यांनी म्हटले.


जागतिक व्यापार परिषदेत बोलताना जेटलींनी ही लढाई एका आठवड्याची नाही. याला विविध मार्गांनी लढा द्यावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. आम्ही सर्व भारतीयांच्या भावना समजू शकतो. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानात मैत्रीपूर्ण किंवा प्रतिस्पर्धी म्हणून क्रिकेट सामना खेळला जाऊ शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.