भारताचे अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांचं योगदान
काळा पैसा आणि बेहिशेबी मालमत्ता कायदा अंमलात आणला
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०७ मिनिटांनी निधन झालं. अरुण जेटली यांना ९ ऑगस्टपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. एम्स रुग्णालयानं एक पत्रक प्रसिद्ध करून अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन झाल्याचं जाहीर केलंय.
जेटली यांचं अर्थमंत्री म्हणून मोठं योगदान
- जीएसटी आणि आयबीसी सारख्या मोठ्या सुधारणा
- तूट असलेल्या बँकांचं विलिनीकरण
- एफडीआय नियम सोप्पे केले
- भारतातील परकीय गुंतवणूक वाढविण्यात यश
- महागाई २.२ वरून २.९ टक्क्यांवर आणण्यामध्ये योगदान
- अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखेमध्ये बदल
- रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट करणे
- काळा पैसा आणि बेहिशेबी मालमत्ता कायदा अंमलात आणला
- देशाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी योगदान
- बँकांमधील एनपीए कमी करण्यात यश
- पंतप्रधानांसोबत जन-धन अकाऊंट योजना प्रत्यक्षात आणली
- आधारसह थेट लाभ योजना लाभ
- चलनविषयक धोरण समितीच्या स्थापनेत योगदान