Arun Yogiraj on Ram Lalla Idol : अयोध्येच्या राम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आलेली मूर्ती पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. ती मूर्ती बोलकी आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. तर अनेकांचे म्हणणे आहे की ही मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतंय की स्वत: राम लल्ला दर्शन देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर मूर्तीत अनेक बदल झाले आहेत. प्रत्येक व्यक्ती असं म्हणतंय की प्राण प्रतिष्ठेनंतर पाहिलेल्या मूर्तीचे संपूर्ण रूप बदलले आहे. अनेक लोक याला प्रभू श्रीराम यांचा चमत्कार असल्याचे म्हणत आहेत. तर ज्या मूर्तीकारानं ही मूर्ती बनवली त्यांनी देखील हेच सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम लल्लाची ही मूर्ती अरुण योगीराज यांनी बनवली होती. खरंतर अरुण योगीराज यांनी ही मुलाखत 'आज तक'ला दिली. त्यांनी सांगितलं की 'गर्भगृहाच्या बाहेर असताना मूर्तीची एक वेगळीच झलक होती. मात्र, जेव्हा गर्भगृहात मूर्तीनं प्रवेश केला तेव्हा तिची वेगळीच झलक पाहायला मिळाली. हे एका चमत्कारासारखं आहे. याविषयी सांगत अरुण योगीराज म्हणाले निर्माण होत असताना मूर्ती वेगळी होती आणि स्थापना झाल्यावर वेगळी होती. मला असं वाटलं की हे माझं काम नाही. ही मूर्तीतर खूप वेगळी दिसते. देवानं वेगळाच रूप घेतला. जेव्हा अलंकार केला, तेव्हा राम लल्ला पूर्णपणे वेगळे दिसू लागले.'



अरुण योगीराज राम लल्लाच्या मूर्तीवर असणाऱ्या हावभावविषयी सांगता म्हणाले, 'दगडावर हावभाव आणणं सोपं नाही आणि तुम्हाला यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मी दगडांसोबत जास्त वेळ राहण्याचा निर्णय घेतला. तिथेच सतत अभ्यास करायचा, लहाण मुलांचे हे फिचर्स असताता त्यावर काम करायचं आणि अशा प्रकारे राम लल्लांची मूर्ती तयार झाली.' 


राम मंदिराचे दरवाजे हे भक्तांच्या दर्शनासाठी सुरु झाले आहे. अयोध्येत राम भक्तांची गर्दी झाली आहे. दररोज राम जीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त गर्दी करतात. मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यूपीचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे सरसंघचालक मोहन भागवत पासून सोबत अनेकांनी हजेरी लावली होती. 


हेही वाचा : 'अपयशी होण्याची भीती...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनची बोलकी पोस्ट


मंदिराविषयी बोलायचे झाले तर त्याचं गर्भगृह मुख्य आकर्षक केंद्र आहे. भक्त इथे आल्यानंतर फक्त ते पाहतच राहतात. श्रीरामांच्या सिंहासनला खूप सुंदर म्हटलं आहे. माहितीनुसार, हे सिंहासन जवळपास 3 फूट उंच आहे.