दिल्ली : राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सनदी अधिकारी यांच्यातील वाद उफाळला. सनदी अधिकाऱ्यांनी संपाचे हत्यार बाहेर काढले तर केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांच्या संपाविरोधात धरणे आंदोलन पुकारले. हा वाद गेले नऊ दिवस चालला. आज नवव्या दिवशी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपले आंदोलन मागे घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,  मुख्यंमंत्री केजरीवाल यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या कथित संपाच्या विरोघात धरणे आंदोलन सुरू केले होते. सनदी अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून आंदोलन करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी आणि नायब राज्यपालांना पत्र लिहून अधिकाऱ्यांना त्यांचे आंदोलन समाप्त करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी विनंती केली होती. त्यानंतर देशातील चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केला होता. नीती आयोगाच्या बैठकीतही या चार मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांचा मुद्दा उपस्थित केला होता. 


केजरीवाल यांनी सचिवालयात अधिकाऱ्यांसोबत लगेच बैठक घ्यावी, अशी सूचना नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना केली आहे. केजरीवाल आणि सनदी अधिकाऱ्यांनी चर्चेद्वारे मतभेद मिटवावेत असेही नायब राज्यपालांनी दोन्ही पक्षांना सांगितले आहे. दरम्यान, नायब राज्यपालांच्या सूचनेनुसार थोड्याच वेळात मुख्यमंत्री केजरीवाल आणि आयएएस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.