Arvind Kejriwal Resignation : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय.. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी मार्लेना सिंह यांच्या नावाची घोषणा केलीय.. केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू असतानाच आतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा करत  केजरीवाल यांनी मास्टरस्ट्रोक मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 च्या विधानसभा निवडणूकीत आतिशी या आमदार झाल्या. चार वर्षात आमदार मंत्री आणि मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आतिशी मार्लेना सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासात मास्टर्स मिळवली आहे. 2020 ला दिल्ली विधानसभेवर त्या आमदार म्हणून निवडणुक आल्या.  मनीष सिसोदीयांच्या राजीनाम्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. सध्या त्या अर्थ, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्री आहेत.  मनीष सिसोदियांच्या शिक्षण विषयक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. केजरीवालांच्या अत्यंत विश्वासू सहका-यांपैकी त्या एक आहेत.  केजरीवाल तुरूंगात असताना त्यांनी सरकार आणि पक्षाचं काम चोखपणे सांभाळलं. तर, आतिशी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपने आप आणि केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र डागल आहे.


'दिल्लीला काही फरक पडणार नाही'


पाच महिन्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहे.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांनी आतिशींचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करत डाव टाकलाय... त्यामुळे केजरीवालांची ही चाल मास्टरस्ट्रोक ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..