गुवाहाटी : देशात सर्वत्र RepublicDay प्रजासत्ताक दिनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच आसाम मात्र चार शक्तिशाली ग्रेनेड हल्ल्यांनी हादरलं आहे. चारपैकी तीन हल्ले हे दिब्रूगड येथे झाले तर, एक हल्ला Charaideo जिल्ह्यात झाला. ज्यामुळे रविवारच्या सकाळी आसाम अक्षरश: हादरलं. प्राथमिक स्तरावर हे स्फोट आसाममधील आसाममधील बंडखोर संघटना, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असाम-इंडिपेंडंट अर्थात उल्फा-आयकडून घडवल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआय या वृत्तसंस्थेने पोलिसांकडून मिळालेल्या माहितीची हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७वर असणाऱ्या एका दुकानाजवळ एक स्फोट झाला, ज्या ठिकाणी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तर दुसरा एक स्फोट दिब्रूगड येथील गुरुद्वाऱ्यापाशी झाल्याची माहिती समोर येत आहे. 




भारतीय संविधानाविषयीच्या रंजक गोष्टी वाचून व्हाल थक्क


दुलीयाजान येथे झालेल्या आणखी एका स्फोटाची माहितीही पोलिसांना मिळाली. ज्याचा तपास अद्यापही सुरु आहे. विविध ठाकाणी झालेल्या या स्फोटांची माहिती मिळताच पोलीस पथकांनी तातड़ीने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी झालेले हे स्फोट ग्रेनेड स्फोट असल्याची शक्यता वर्तवण्याक येत आहे. आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही स्फोटांच्या घटनांची माहिती कळताच पोलिसांची एक चमू घटनास्थळी रवाना झाला. या स्फोटांमागे कोणाचा हात आहे याची चौकशी करण्यात येत आहे.