Republic Day : पाहा सिंगापूरच्या कलाकाराने साकारलेलं खास Google डुडल
खास निमित्ताने साकारण्यात आलेल्या या डूडलमध्ये....
मुंबई : Google गुगलकडून कायमच काही महत्त्वाच्या प्रसंग आणि दिवसांचं औचित्य साधत त्या निमित्ताने अनुक एका दिवसाचं महत्त्वं सांगणारे डुडल साकारण्यात येतात. सध्या गुगलकडून असंच एक अतिशय खास स्वरुपाचं डूडल साकारण्यात आलं आहे. निमित्त आहे ते म्हणजे भारताच्या ७१व्या प्रजासत्ताक दिनाचं 71st Republic Day. विविधतेत एकता असणाऱ्या या भारत देशाचे कैक गुणविशेष आणि सांस्कृतिक वारसा या कलात्मक डुडलमधून साकारण्यात आला आहे.
ताजमहाल, इंडिया गेट, राष्ट्रीय पक्षी मोर, भारतीय कला, भारतीय वस्त्रोद्योग असे अनेक बारकावे डुडलमधून साकारण्यात आले आहेत. सिंगापूरस्थित मेरु सेठ यांनी हे डुडल साकारत सारा देशच जणून एकवटण्याची कलात्मक किमया केली आहे. भारतीय संविधाच्या आखणी आणि अस्तित्वात येण्यानंतर प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताची नवी ओळख समोर आली. अशा या दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहसुद्धा पाहायला मिळत आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने, २६ जानेवारी १९५०ला भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. २६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५० हे दोन्ही दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस समजले जातात.
भारतीय संविधानाविषयीच्या रंजक गोष्टी वाचून व्हाल थक्क
राज्यघटनेचा स्वीकार केल्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र झालं होतं. या सर्व घटनांचं स्मरण म्हणून देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. जवळपास तीन वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली होती.