नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा विळखा वाढत असल्याचं लक्षात येताच, याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसले. Coronavirus या विषाणूचा धोका पाहता अखेर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय़ घेतलाय पहिल्या टप्प्यात त्यांनी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. ज्यानंतर हा कालावधी आणखी काही दिवसांनी वाढवण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधांनी लॉकडाऊनचा पहिला टप्पा संपत असतानाच अखेरच्या दिवशी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची अधिकृत घोषणा केली. देशातील नागरिकांना संबोधित करत त्यांनी ही महत्त्वाची बाब सर्वांसमक्ष ठेवली. या सर्व क्षणांची विक्रमी नोंद झाल्याची माहिती आता समोर येत आहे. 


BARC कडून गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार पंतप्रधानांनी दुसऱ्यांचा जेव्हा लॉकडाऊनची घोषणा केली आणि देशाला संबोधित केलं, तेव्हा एकाच वेळी २०.३ कोटींहून अधिक नागरिकांनी त्यांचा हा संदेश एकाच वेळी पाहिला. परिणामी मोदींचा एक जुना विक्रमही मोडित निघाला. इतकंच नव्हे, तर इथे आरोह्य सेतू ऍपचीही अशीच विक्रमी कामगिरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 


 


आतापर्यंत कोरोना विषाणूशी लढतेवेळी पंतप्रधानांनी एकूण चार वेळा देशाला संबोधित केलं आहे. वेळोवेळी नागरिकांना धीर देत, त्यांचा आत्मविश्वास वाढवत आणि संकटसमयी एकजुटीने काम करत संकटावर मात करण्याचा विश्वास देत त्यांनी आपली भूमिका बजावली आहे. लॉकडाऊनची पहिल्यांदाच घोषणा केली गेली जेव्हा जवळपास १९.३ कोटी नागरिकांनी मोदींचं हे संबोधनपर भाषण पाहिलं होतं. पण, चौथ्यांदा केलेल्या संबोधनाला मात्र देशवासियांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. 
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या या काळात विशेष म्हणजे १२ एप्रिलच्या आठवड्यात देशभरात टेलिव्हिज पाहण्याच्या प्रमाणात ३८ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे आकडे समोर येत आहेत.