लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका (UP Assembly Elections)  होण्यास अजून काही महिने शिल्लक आहेत, परंतु राज्यात आतापासूनच निवडणुकीत उत्साह दिसून येऊ लागला आहे. AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवीसी (Asaduddin Owaisi )  म्हणाले की, मी कोणत्याही परिस्थितीत योगी आदित्यनाथ यांना 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री होऊ देणार नाही. ओवीसी यांच्या या वक्तव्याला खजील पणे उत्तर देत, सीएम योगी यांनी त्यांना एक मोठा नेता म्हणून संबोधले आणि त्यांचे आव्हान स्वीकारले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवीसी यांच्या या विधानाबद्दल एका टीव्ही चॅनेलशी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले की, "यूपीमध्येही यावेळी सुद्धा भाजपचे सरकार स्थापन होईल. ओवीसी हे एक मोठे नेते आहेत. परंतु ते विसरत आहेत की, ते भाजपाला उत्तर प्रदेशात आव्हान देऊ शकत नाहीत. कारण भाजपा येथे आपले मूल्य आणि मुद्द्यांवर निवडणुका लढवत आहेत. ते अजूनही आम्हाला आव्हान देत असतील तर, ते आव्हान आम्ही स्वीकारतो."


100 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा


हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यावेळी ओवीसी यांच्या पक्षानेही यूपी विधानसभा निवडणुकीतील रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या AIMIM ने रविवारी उत्तर प्रदेशमधील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवण्याची घोषणा केली.


ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवीसी म्हणाले की, ते उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका ओम प्रकाश राजभर यांच्या नेतृत्वाखालील सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आणि छोटे पक्षांचे गठबंधन संकल्प मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने लढतील.


ओवीसी यांनी ट्वीट केले की, "उत्तर प्रदेश विधानसभेच्या संदर्भात आम्ही 100 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही उमेदवारांचा अर्जही जारी केला आहे."