मुंबई : मुसलमानांचे प्रश्न दिवस - रात्र मांडणारे खासदार असुद्दीन यांच्यावर सोशल मीडियातून सडेतोड टीका होत आहे. ओवैसी कायम गरिबांच्या प्रश्नांवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र त्यांनी मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यातून श्रीमंतीचे दर्शन घडवले. आणि याच गोष्टीवरून त्यांच्यावर टीका होत आहे. 


यामुळे होते चर्चा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून कळतंय की हा किती शाही सोहळा होता. या कार्यक्रमात अनावश्यक केलेल्या खर्चाची उधळण अगदी सहजपणे दिसत आहे. ओवैसींनी केलेला हा खर्च इस्लामच्या विरूद्ध असल्याचं सांगितलं जात आहे. 



मुलीच्या साखरपुड्यावर केला एवढा खर्च


ओवैसीच्या मुलीचा साखरपुडा शनिवारी पार पडला. द साहब या संकेतस्थळाकडून मिळालेल्या माहिती ओवैसींनी मुलीच्या या सोहळ्यात 6 करोड रुपये खर्च केले आहेत. यातील 1 करोड 25 लाख तर फक्त दुबईतून आणलेल्या गोल्ड प्लेटेड प्लेट्सवर आणि फुलांवर खर्च केला आहे. तर 85 लाख हे फक्त जागेसाठी खर्च झाले. या सोहळ्याला तब्बल 10 हजार पाहुणे उपस्थित असून तब्बल 450 प्रकारचे पदार्थ होते. हा सोहळा शुक्रवारी हैदराबादमध्ये पार पडला.



आतापर्यंत अनेकदा मुस्लिम समाजाचे प्रश्न ओवैसी स्टेजवरून मांडत होते. पण त्यांनी स्वतःच्याच मुलीला केलेला खर्च हा मुस्लिम समाजाला मान्य नाही. इतका खर्च फक्त मुलीच्या साखरपुड्यात करण्यापेक्षा त्यांनी गरिबांना मदत करावा अशी टीका होत आहे.