काकी रेप म्हणजे काय? दोन दिवसांनी त्याच मुलीवर गँगरेप... पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं
Assam Gangrape : कोलकता आणि बदलापूर मधल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी देशभरात असंतोषाचं वातावरण असतानाच आता आसाममध्ये सामुहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. अवघ्या 15 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन गँगरेप करण्यात आला.
Assam Rape : कोलकता आणि बदलापूर मधल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी देशभरात असंतोषाचं वातावरण असतानाच आता आसाममध्ये सामुहिक अत्याचाराची घटना (Assam Gangrape) समोर आली आहे. अवघ्या 15 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन गँगरेप करण्यात आला. पीडित मुलगी ट्यूशनवरुन घरी येत होती. मोठं होऊन पोलीस अधिकारी बनण्याचं तीचं स्वप्न होतं. यासाठी ती मन लावून अभ्यासही करायची. ट्यूशनवरुन ती आपल्या परिसरात आली, त्याचवेळी काही नराधमांनी तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर सामुहित अत्याचार केला.
मदतीसाठी पीडित मुलीने आरडाओरडा केला, पण दुर्देवाने तिचा आवाज कोणाच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही. मुलीने आरोपींकडे सोडण्याची विनवणी केली, पण त्यांच्या डोळ्यात वासना भरली होती. अवघ्या 15 वर्षांच्या मुलीवर सामुहिक अत्याचार करत तिला स्मशानभूमीजवळ टाकून ते फरार झाले.
डोळ्यात अश्रू आणणारी कहाणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच पीडित मुलीने आपल्या काकीला रेप (Rape) म्हणजे काय असतं? असा प्रश्न विचारला होता. कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि रेप प्रकरण या मुलीने पेपरमध्ये वाचलं होतं. यावर तीने आपल्या काकीला हा प्रश्न विचारला होता.पीडित मुलगी या घटनेने पुरती कोसळली आहे. तिच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसलाय. आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी, जेणेकरुन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
आसाममधल्या गुवाहाटी इथल्या नगांव इथे एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचाराची घटना घडली. पीडित मुलगी ट्यूशनमधून सायकलवरुन आपल्या घरी निघाली. एका सुमसाम रस्त्यावर तीन जणांनी तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका स्मशानभूमीजवळ मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. स्थानिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत एका आरोपीला अटक केली. तफाजुल इस्लाम असं या आरोपीचं नावा होतं. घटना घडली त्याठिकाणी त्याला घेऊन जात असताना पोलिसांना धक्का देत त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. यात तो जवळच्या तलावात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. तलावात पडल्या त्यावेळी आरोपीच्या हातात बेड्या होत्या. यावरुन आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गँगरेपमधला आरोपी बुडून मेला की त्याला बुडवण्यात आलं. आरोपीची जबाबादारी पोलिसांची असताना तो पळालाच कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.