जोधपूर :  काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामिनावर आज सुनावणी झाली. गेल्या २ दिवसांपासून सलमान जेलमध्ये आहे. जेलमध्ये सलमानला खास ट्रिटमेंट मिळत असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानने जेलमध्ये कैदांचा ड्रेसही नाही घातला आणि जेवण ही नाही केलं. गुरुवारी सलमानसाठी जेलमध्ये रात्र काढणं कठीण झालं होतं. मच्छरांमुळे सलमानला झोप नाही लागली. ओडोमस लावल्यानंतर तो झोपला तर सकाळी १० ला तो उठला.


न्यूज२४ने दिलेल्या बातमीनुसार, शुक्रवारी सकाळी त्याला जेलमध्ये चने आणि चहा विचारली गेली. पण त्याने ती घेतली नाही. त्यानंतर त्याने बाहेरुन कॉफी आणि जेवन मागवलं.


सलमानला भेटण्यासाठी अभिनेत्री प्रिती जिंटा जेलमध्ये पोहोचली तेव्हा अर्धातास दोघांनी चर्चा केली. त्यानंतर सलमान दिवसभर जेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या मुलांमध्ये आणि ऑटोग्राफ देण्यात व्य़स्त होता.


बॅरकमध्ये सलमानला भेटण्यासाठी लोकं येत होती. तो ऑटोग्राफ देत होता. हे सगळं पाहून जवळच असले आसाराम बापू यांना ते पटलं नाही. त्यांनी म्हटलं की 'मला भेटण्यासाठी तर कधी नाही आले पण हा सेलिब्रिटी आहे म्हणून भेटण्यासाठी आले.'


संबंधित बातम्या


सलमानच्या बहिणी पोहोचल्या कोर्टात, बॉडीगार्डला मात्र पोलिसांनी अडवलं


सलमान खान जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली


सलमानला आत टाकणारा, बिष्णोई समाज आहे तरी कोण?