जोधपूर : लैंगिक अत्याचार प्रकरणी 5 वर्षापासून तुरुंगात असलेले अध्यात्मिक गुरु आसाराम बापूंना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. आसाराम बापूसह इतर 2 आरोपींनी ही कोर्टाने दोषी ठरवलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जेलमध्येच ही सुनावणी झाली. जेलच्या परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. आसाराम बापूंना कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं होतं. 2013 मध्ये शाहजहांपूरच्या 16 वर्षाच्या मुलीने आसाराम यांच्यावर जोधपूर आश्रममध्ये बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून आसाराम हे जेलमध्ये आहेत. आसाराम यांच्यासह पाचही आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाराम यांच्यासह इतर चारही आरोपी शिवा, शरतचंद्र, शिल्‍पी आणि प्रकाश यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर पंचकूलामध्ये हिंसा झाली होती. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून राजस्थान, गुजरात आणि हरियाणा सरकारने सुरक्षा वाढवली आहे. या तीनही राज्यांमध्ये 77 वर्षांचे आसाराम बापू यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने तीनही राज्यांना सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले होते.


पुढची शक्यता


केंद्रीय कारागृहाकडून विशेष कोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर त्यांचे वकील गुरुवारी राजस्थान उच्च न्यायालात शिक्षेविरोधात याचिका करु शकतात. निर्णयाची प्रत मिळायला उशीर लागतो आणि वकिलांना त्याचा अभ्यास करण्यासाठी देखील वेळ लागेल त्यामुळे शुक्रवारी वकील कोर्टामध्ये याचिका दाखल करतील असं बोललं जातंय. शनिवारी कोर्ट बंद असल्याने आसाराम यांच्या शिक्षेविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी होईल. याआधी आतापर्यंत 12 वेळा आसाराम यांचा जामीन अर्ज ट्रायल कोर्ट, राजस्थान हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे.