नवी दिल्ली :  लहान मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम याला दोषी ठरविण्यात आलेय. आसारामसह पाचही आरोपी यांना दोषी ठरविण्यात आलेय. १५ ऑगस्ट २०१३ रोजी लैंगिक अत्याचार केले होते. आसारामवरील सर्व आरोप सिद्ध झालेत. त्यामुळे त्याला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आता सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दरम्यान, आज सुनावणीच्यावेळी १४४ कलमानुसार ३० एप्रिलपर्यंत कडेकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. बाबा गुरमीतराम रहीम याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हरियाणात मोठा हिंसाचार करण्यात आला होता. त्यामुळे यावेळीही खबरदारी घेण्यात आलेय. दोषी ठरविण्यात आलेला आसारामची संपत्ती १० हजार कोटी असून त्याचा तो मालक आहे. तर आसारामचा मुलगा नारायण साईसोबत त्याने ४०० आश्रमाच्यामाध्यमातून नेटवर्क पसरवलेय.


आसाराम कसा झाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिल १९४१ मध्ये सिंध प्रांतात (आता पाकिस्तान) बेरानी गावात जन्म झालाय. सिंधी व्यापारी समुदाय आसारामचा संबध आहे. १९४७ नंतर आसाराम भारतात आला. त्यानंतर अहमदाबाद येथे राहत होता. १९६०च्या दशकात लीलाशाह त्याने आपला आध्यात्मिक गुरु बनविले. लीलाशाह यांने असुमल हरपलानीचे नाव आसाराम ठेवले. प्रवचन केल्यानंतर मोफत जेवण देवून त्यांने आपला भक्तगण वाढवला. या त्याच्या वागण्याने त्याचा मोठा भक्तगण वाढीला लागला. आसारामचे संकेतस्थळ (वेबसाइट) असून त्याचे चार कोटी भक्तगण आहेत.


४०० आश्रमांचे साम्राज्य उभे केले


आसारामचे भक्तगण जगात आहेत. आसारामचा मुलगा नारायण साई याने भारतात नाही तर परदेशात ४०० आश्रमांचे नेटवर्क उभे केले. त्याची संपत्ती १० हजार कोटी रुपयांची आहे. या संपत्तीची चौकशी सुरु आहे. आश्रम तयार करताना जमीन हडपली गेली आहे. आसारामचे वागणे ह राजकीयनेत्याप्रमाणे आहे. त्याने त्यासाठी काही राजकीय नेत्यांचा वापरही केलाय. कारण आसाराम याचा भक्तगण मोठा असल्याने राजकीय नेत्यांनी त्याला महत्व दिले. १९९० ते २००० दरम्यान, भक्तांच्या यादीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी यांचाही समावेश आहे. तसेच दिग्विजय सिंग, कमलनाथ, मोतीलाल व्होरा आदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांची नावे या यादीत आहे. तसेच भाजपाचे विद्यमान आणि माजी नेतेही यांचाही समावेश आहे. शिवराज सिंग चौहान, उमा  भारती, रमन सिंग, प्रेम कुमार धूमल, वसुंधरा राजे आदी मुख्यमंत्र्यांचाही या यादीत समावेश आहे.


आसारामचा खटला उभा राहल्यानंतर राजकीय नेते दूर


२००८ मध्ये आसाराम याच्या मुटेरा आश्रमात दोन लहान मुलांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्याच्यापासून चार हाताचे अंतर राखले. ५ जुलै २००८ मध्ये आसारामच्या मुटेरा आश्रमाच्या बाहेर साबरमती नदीच्या सुख्या पात्रात १० वर्षी अभिषेक वाघेला आणि ११ वर्षीय दीपेश वाघेला यांचे शव अर्धवट जळलेल्या स्थितीत आढळून आलेत. अहमदाबादच्या या चुलत  भावंडाचे नाव काही दिवसांपूर्वी आसारामच्या 'गुरुकुल' नावाच्या स्कूलमध्ये घातले होते. मात्र, या खटल्याच्या चौकशीचा अहवाल अजुनही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. २०१२ मध्ये पोलिसांनी ७ कर्मचाऱ्यांवर हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. हे प्रकरण अहमदाबादच्या सत्र न्यालायत प्रलंबित आहे.


नेमकं काय आहे हे प्रकरण?


लैंगिक अत्याचार प्रकरणी ५ वर्षापासून तुरुंगात असलेले अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जेलमध्येच ही सुनावणी झाली. जेलच्या परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. आसाराम बापूला न्यायालय काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं होते. २०१३  मध्ये शाहजहांपूरच्या १६ वर्षांच्या मुलीने आसाराम याच्यावर जोधपूर आश्रममध्ये बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून आसाराम हे जेलमध्ये आहे. आसाराम यांच्यासह पाचही आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 


आसाराम याच्यासह इतर चारही आरोपी शिवा, शरतचंद्र, शिल्‍पी आणि प्रकाश यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसा झाली होती. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून राजस्थान, गुजरात आणि हरियाणा सरकारने सुरक्षा वाढवली आहे. या तीनही राज्यांमध्ये  ७७ वर्षांचे आसाराम बापू यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने तीनही राज्यांना सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले होते.