Ashneer Grover on Narayan Murthy 70 Hours Work: आजच्या जगाशी स्पर्धा करायची असेल तर आठवड्यातून 70 तास काम करा असा कानमंत्र इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी दिल्यानंतर सध्या यावरून समाजमाध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगलेली आहे. नारायण मुर्ती यांच्या या वक्तव्यावर विविध चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते आहे. त्यातून लोकप्रिय सेलिब्रेटींनीही यावरून आपली मतमतांतरे सोशल मीडियावर लिहायला सुरूवात केली आहे. त्यातील कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यानंही नारायण मुर्तींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि आपले मत मांडले होते. त्यानंतर आता यावर अश्नीर ग्रोवर आणि चेतन भगत यांनीही आपली मतं मांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्नीर ग्रोवर हा सध्या शार्क टॅंकमध्ये गाजतो आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अश्नीर ग्रोवरनं आपल्या X हॅण्डलवरून (पुर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं आपलं मतं माडलं आहे. नारायण मुर्तींच्या या सल्ल्यावरून तो नक्की काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत. यावेळी त्यांनी असं लिहिलं आहे की, ''मला असं वाटतंय की जनता (लोकं) थोडीशी गोंधळली आहेत. कारण त्यांना असं वाटतंय आणि आऊटकम म्हणजे रिजल्ट्स, निकाल याच्यापेक्षा तास म्हणजे वर्किंग आवर्समध्ये आपलं काम हे मोजले जाते. दुसरीकडे लोकांना असं वाटतं आहे की तरूणांमध्ये असणारा आळस हाच देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे. त्याच्या अधोगतीसाठी जबाबदार आहे. किती मजेदार आहे की अशा गोष्टींनी जेव्हा आपण नाराज होते तेव्हाच आपण क्रिकेट, धर्म, जात, भाषा यांच्यापेक्षा जास्त एक होतो.'' 


खाली त्यांनी एका X युझरचे ट्विट रिट्विट केले आहे. सध्या त्यांच्या या पोस्टवर नाना तऱ्हेच्या कमेंट्स आल्या आहेत. अश्नीर ग्रोवर यांच्या या ट्विटचीही सध्या सर्वत्र चर्चा असून त्यांच्या या मताशी काही नेटकरी हे सहमत आहेत. 


3one4 Capital च्या 'द रिकोर्ड' या पोडकास्टच्या एपिसोडमध्ये बोलताना नारायण मुर्ती यांनी हे विधान केले होते. त्यानंतर माध्यमांमध्ये याची जोरात चर्चा सुरू झाली होती. त्यांनी भारताच्या कार्यक्षमतेवर चिंता दाखवली होती आणि जगाशी सामना करायचा असेल तर तरूणांनी 70 तास आठवडभर काम करायला पाहिजे असा सल्ला दिला होता. ज्याचा बराच गाजवाजा सुरू झाला आहे. 



ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी नारायण मुर्तींच्या या वक्तव्यावर समर्थन दर्शवले आहे. तर अश्नीर ग्रोवर यांच्या मताशी ते असहमत आहेत. तर चेतन भगत म्हणाला की, ''कष्ट घेणे हे नक्कीच महत्त्वाचे आहे. परंतु किती तास ही मेहनत घेतली हे तपासणं ही बरोबर नाही.''