अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची घेतली भेट
अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासादर शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या ६ जनपथ येथे भेट घेऊन चर्चा केली. मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या बैठकीचा आढावा शरद पवार यांना सांगितला. तर मराठा आरक्षण संदर्भात कोर्टात बाजू मांडण्यासाठी सरकारची तयारीची माहिती दिली.
मात्री विजय वडेट्टीवार आणि बाळू धानोरकर यांनीही शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष बदलांबाबतही पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे समजते आहे. विजय वडेट्टीवार काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. खासदार बाळू धानोरकरही या चर्चेत सहभागी होते.
आशिष शेलार यांनीही घेतली भेट
भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासादर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला गेले आहे. दिल्लीतील ६ जनपथ येथे त्यांनी भेट घेतली. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात खलबते झाली. ही भेट मराठा आरक्षणांच्या (Maratha reservation) पार्श्वभूमीवर असल्याचे सांगितले जात आहे.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्याआधी मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. महाविकास आघाडी सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीत शरद पवार यांच्या निवास्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली. आज सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण भेटायला पोहोचले होते. मराठा आरक्षण बैठकीनंतर दिल्लीत चव्हाण पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे. (Big news BJP leader Ashish Shelar meets NCP president Sharad Pawar)
या बैठकीनंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, याआधी सुद्धा आशिष शेलार यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी राजकीय वातावरणात चर्चेला जोर आला होता.