आशिया कपमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा दारुण पराभव केला आहे. मुल्तानमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नेपाळसमोर 342 धावांचं लक्ष्य उभं केलं होतं. पाकिस्तानची हा आशिया कपमधील तिसरी सर्वाधिक मोठी धावसंख्या ठरली. स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणारा पहिला संघ 104 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने 238 धावांनी हा सामना जिंकला. आशिया कपच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात होणार रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; रोहित, विराट आणि बुमराहवर सगळ्यांच्या नजरा


 


दरम्यान, पाकिस्तानच्या बाबर आझमने कर्णधार म्हणून आशिया कपमधील सर्वाधिक धावसंख्या उभारतविराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला. या सामन्यात एकूण 14 रेकॉर्ड झाले असून, एकट्या बाबर आझमने 7 रेकॉर्ड्स केले आहेते. 


1) बाबरने हासीम आमलाला टाकलं मागे


28 वर्षीय बाबर आझमने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 19 वे शतक झळकावले. फक्त 102 डावांमध्ये त्याने हा रेकॉर्ड केला असून, सर्वाधिक वेगवान कामगिरी करणारा फलंदाज ठरला आहे. यासह आझमने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाचा ​​विक्रम मोडला, ज्याने 104 डावात 19 शतकं झळकावली होती. विराट कोहलीने 124 डावांमध्ये हा रेकॉर्ड केला होता. 


2) आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा


बाबर आझमने नेपाळविरुद्ध 131 चेंडूत 151 धावा ठोकल्या. आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून 150 धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम त्याने मोडला. कोहलीने 2014 मध्ये बांगलादेशविरुद्ध 136 धावा केल्या होत्या.


3) आशिया कपमध्ये दुसरी सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या


आशिया कपमध्ये 150 धावांचा आकडा गाठणारा बाबर आझम दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी विराट कोहलीने 2012 मध्ये पाकिस्तानविरोधात 183 धावा केल्या होत्या. आशिया कपमध्ये हे दोन फलंदाज वगळता एकाही खेळाडूला 150 पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत. 


4) पाकिस्तानी फलंदाजाची सर्वाधिक धावसंख्या


आशिया कपमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड युनिस खानच्या नावे होता. त्याने 2004 मध्ये हाँगकाँगच्या विरोधात 144 धावा केल्या होत्या. बाबरने 151 धावा ठोकत हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 


5) आशिया कपमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या


बाबर आझमने मुल्तान क्रिकेट स्टेडिअममध्ये 151 धावा केल्या. आशिया कपमध्ये घरच्या मैदानावर पाकिस्तानी खेळाडूने ठोकलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. बाबरने श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाचा रेकॉर्ड मोडला आहे. राणातुंगाने 1997 मध्ये कोलंबोच्या मैदानावर भारताविरोधात 131 धावा केल्या होत्या. 


6) कर्णधार म्हणून दोन वेळा 150 पेक्षा अधिक धावा 


बाबर आझमची एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या 158 आहे. त्याने आता नेपाळविरोधात 151 धावा ठोकत एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा 150 चा आकडा पार केला आहे. या दोन्ही धावसंख्या त्याने कर्णधारपदी असतानाच ठोकल्या आहेत. 


यासह, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा 150 पेक्षा जास्त धावा करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. भारताकडून विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच आणि इंग्लंडचा अँड्र्यू स्ट्रॉस यांनीही 2-2 वेळा अशी कामगिरी केली आहे.


7) सर्वाधिक वेळा 150 पेक्षा जास्त धावसंख्या


फखर जमानने पाकिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 150 हून अधिक धावा केल्या आहेत. बाबर आझम या रेकॉर्डच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 4 खेळाडूंचा विक्रम मोडला ज्यांनी प्रत्येकी एक वेळा पाकिस्तानसाठी 150 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. यामध्ये सईद अन्वर, इम्रान नजीर, शर्जील खान आणि इमाम-उल-हक यांचा समावेश आहे