आशियातलं सर्वात मोठं ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं
पृथ्वीवरच्या नंदनवनातली, अर्थात काश्मीरची, वसंतच्या आगमानं काश्मीरच्या निसर्ग सौंदर्यालाही चार चांद लागलेत.
जम्मू-काश्मीर : पृथ्वीवरच्या नंदनवनातली, अर्थात काश्मीरची, वसंतच्या आगमानं काश्मीरच्या निसर्ग सौंदर्यालाही चार चांद लागलेत. नितांत सुंदर अशा दल सरोवरोवच्या किनारी असणाऱ्या ट्युलिप गार्डनमध्ये ट्युलिप्सचा ताटवा बहरून आलाय. काश्मीरचे पर्यटनमंत्री तास्किद मुफ्तींनी ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं केलं. श्रीनगरच्या या ट्युलिप गार्डनमध्ये तब्बल ४० जातींची तब्बल साडे बारा लाख ट्युलिप्सची रोपं लावण्यात आली आहेत. निसर्गाचं हे रंगीबेरंगी रुप बघण्यासाठी पर्यटक आता ट्युलिप्स गार्डनमध्ये गर्दी करत आहेत.