`या` वधू-वराने दर महिन्याला जिंकला मोफत `पिझ्झा`; कसं ते जाणून घ्या...
Free Pizza : लग्नाच्या सात फेऱ्यांनंतर घेतल्यानंतर वधू-वरांने एका कागदावर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याची मजेदार यादी समाविष्ट आहे. या यादीमध्ये दररोज जिममध्ये जाणे, दर 15 दिवसांनी खरेदी करणे आणि दर महिन्याला पिझ्झा खाणे इ. समावेश होता.
Assam Couple Getting Free Pizza Every Month: आसामचे एक जोडपे जे काही महिन्यापूर्वी स्वत:च्या लग्नाच विचित्र करारा वर स्वाक्षरी केल्याने व्हायरल (viral video) झाले होते. आता पुन्हा एकहा आसामचे हे जोडपे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शांती प्रसाद आणि मिंटू राय यांचा 21 जून रोजी आसाममध्ये विवाह झाला होता. लग्नाच्या सात फेऱ्या घेतल्यानंतर जोडप्याने एका कागदावर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये करा आणि करू नका याची मजेदार यादी होती. या यादीमध्ये दररोज जिममध्ये जाणे, दर 15 दिवसांनी खरेदी करणे आणि दर महिन्याला पिझ्झा खाणे समाविष्ट होते.
PIZZA HUT ने लग्नात ठेवलेले वचन पूर्ण केले
त्यांच्या लग्नाला काही महिने उलटले असताना, ते इतर अटींचे पालन करत आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसताना. या जोडप्याला बहुराष्ट्रीय रेस्टॉरंट चेन पिझ्झा हट (Pizza Hut) ने दर महिन्याला पिझ्झा खाण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यास सांगितले आहे. करवा चौथच्या निमित्ताने पिझ्झा हट इंडियाने इंस्टाग्रामवर (Instagram) घोषणा केली की ते या जोडप्याला वर्षभरात महिन्यातून एकदा मोफत पिझ्झा उपलब्ध करून देतील. आता हे दोन्ही जोडपे एका वर्षासाठी ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) बनले आहेत जे पिझ्झा हटमध्ये जाऊन पिझ्झाचा (pizza) आनंद घेऊ शकतात.
वाचा : Cricket इतिहासातील असे 3 विचित्र योगायोग ज्यांच्यावर विश्वास बसणे अशक्य
एक वर्षासाठी दर महिन्याला मोफत पिझ्झा
पिझ्झा हटने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमच्या पतीसोबत दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी दर महिन्याला पिझ्झा फ्री!' व्हिडिओमध्ये जोडपे जवळच्या पिझ्झा हट आउटलेटमध्ये चालत असल्याचे दाखवले आहे. जिथे त्यांनी विविध प्रकारच्या स्वादिष्ट पिझ्झाचा आनंद घेतला. जेवण येण्याची वाट पाहत असताना दोघेही एकत्र सेल्फी घेताना दिसले.
पिझ्झा हट इंडियाने गुरुवारी पोस्ट शेअर केली आणि तेव्हापासून व्हिडिओला जवळपास 30,000 व्ह्यूज आणि 1,300 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले, 'फ्री पिझ्झासाठी हे निन्जा तंत्र आहे का?'