नवी दिल्ली : आसाम सरकारने सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा (AFSPA), 1958 ला पुढील 6 महिन्यांसाठी वाढवला आहे. सरकारने AFSPA च्या कलम 3 अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करून 28 ऑगस्ट, 2021 पासून सहा महिन्यापर्यंत पूर्ण आसाम राज्य 'अशांत क्षेत्र' घोषित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाममध्ये नोव्हेंबर 1990 मध्ये AFSPA लावण्यात आला होता. तेव्हापासून राज्यात समिक्षा करून सहा - सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे.


राज्यात AFSPA चा कालावधी वाढल्याचे कोणतेही कारण सांगितले नाही. परंतू जाणकारांच्या मते, राज्यातील अनेक भागात झालेल्या हत्या, लूटच्या घटना लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मागील काही महिन्यांत आसामच्या दीमा हसाओ जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांद्वारे 5 लोकांच्या हत्येच्याही घटना झाल्याचे सांगितले जात आहे. दहशतवाद्यांनी पाच लोकांच्या हत्या आणि अनेक ट्रकांना आग लावली होती.


त्यानंतर 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीच्या आधी 6 महिन्यासाठी राज्यात AFSPA लावण्यात आला होता. तेव्हा आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले होते.