Second Marriage : प्रत्येक देशात विवाहाशी संबंधित कायदे वेगळे असतात. इतकंच काय, तर यासंबंधीच्या धारणा प्रत्येक समुदायानुसारही बदलतात. पण, देशातील एका राज्यात आता याच विवाहांसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा परिणाम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार असून, त्यांना एक लहानशी चूकही महागात पडू शकते. त्यामुळं सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्येही याच नियमाची चर्चा पाहायला मिळत आहे. 


कोणत्या राज्यात घेतला विवाहसंबंधी निर्णय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाम राज्य शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवा नियम आखला असून, कोणत्याही कर्मचाऱ्याची पहिली पत्नी किंवा पत्नी हयात असलाना त्या व्यक्तीनं दुसरं लग्न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शासनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार पहिल्या लग्नातील पती किंवा पत्नी हयात असल्यास दुसरं लग्न करण्यापूर्वी कायदेशीर परवानगी असूनही राज्य शासनाची परवानगी घेणं अपेक्षित आहे. असं असलं तरीही या अधिसूचनेमध्ये घटस्फोटाच्या कायदेशीर तरतुदींचा उल्लेख मात्र करण्यात आलेला नाही. 


आसाम मधील हेमंत बिस्व सर्मा सरकारच्या वतीनं 1965 मधील नियम 26 च्या तरतुदींनुसार ही सूचना जारी करण्यात आली आहे. वरील नियमांचं पालन न केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना नोकरीवरून काढण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. 


हेसुद्धा वाचा : 'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य 


एकाएकी का चर्चेत आला हा मुद्दा? 


भारतात मुस्लिम पर्सनल लॉमधील तरतुदींनुसार या समुदायातील नागरिक एकाहून अधिक लग्न करु शकतात. कायदेशीरित्या हा गुन्हा नाही, पण आसाममध्ये मात्र नव्या आदेशांनुासार आता मुस्लिम कर्मचाऱ्यांनाही दुसरं लग्न केल्यास कारवाईला सामोरं जाऊ शकतं. ज्यामुळं या निर्णयाची बरीच चर्चा होताना दिसत आहे.